Dehuroad : कुटुंबावर वर्चस्व आणि परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी भांडण; तिघांना अटक

एमपीसी न्यूज : कुटुंबावर वर्चस्व आणि परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी चार जणांनी मिळून दोघांना मारहाण करत परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना मंगळवारी (दि. 5) रात्री विकासनगर, देहूरोड येथे घडली. पोलिसांनी या प्रकरणातील तीन जणांना अटक केली आहे.

किशन बालकिशन टाक (वय 39, रा. एम.  बी. कॅम्प, देहूरोड), साजन मनू मेहरा (वय 26, रा. देहूरोड बाजार), संजू ओम प्रकाश टाक (वय 26) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यांच्यासह विशाल (पूर्ण नाव माहिती नाही, रा. देहूरोड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी रोहन राजेंद्र टाक (वय 18) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किशन हा फिर्यादी यांचा चुलता आहे. आरोपीचे फिर्यादी यांच्या भावासोबत मंगळवारी सकाळी भांडण झाले. या भांडणाच्या कारणावरून मंगळवारी रात्री आरोपीने त्याच्या तीन साथीदारांसह फिर्यादी यांच्या कुटुंबावर व राहत्या परिसरात वर्चस्व राहावे म्हणून हल्ला केला. फिर्यादी यांच्या आईला लाकडी बांबूने मारहाण केली. तसेच फिर्यादी यांचा भाऊ रोनक याला लोखंडी कोयत्याने डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले.

या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.