Dehuroad : कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालय अधीक्षकपदी राजन सावंत

Rajan Sawant as Office Superintendent of Cantonment Board

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालय अधीक्षकपदी राजन सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सावंत हे कॅन्टोन्मेंट बोर्डात लेखापाल म्हणून तीन वर्षांपासून काम पाहत होते. नुकत्याच झालेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बैठकीत त्यांची बोर्डाच्या कार्यालय अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.

सावंत यांनी मोटर मेकॅनिकल इंजिनीरिंगची पदवी संपादन केली आहे. 1985 साली देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डात अनुकंपा तत्वावर नोकरीला लागले. त्यांनी जकात विभागात कनिष्ठ लिपिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात कारकून, लेखा विभागात पेन्शन क्लार्क आणि तीन वर्ष लेखापाल म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

त्याचबरोबर २०१५ मध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डाचे तत्कालीन अध्यक्ष व ब्रिगेडिअर ओ. पी. वैष्णव यांच्या हस्ते उल्लेखनीय कामगिरीबाबत गौरविण्यात आले.

लेखा विभागात पेन्शन क्लार्क म्हणून काम करताना पेन्शनची 60  प्रलंबित प्रकरणे निकाली काढल्यानिमित्त २०१९ मध्ये खासदार श्रीरंग बारणे, माजी राज्यमंत्री बाळा बाळा भेगडे आणि बोर्डाचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित सानप यांच्या हस्ते सेवा गौरव पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

कार्यालय अधीक्षक पदाच्या माध्यमातून देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील नागरिकांच्या समस्या समजावून घेत त्या सोडविण्याला प्राधान्य राहील. त्याचबरोबर सध्या कॅन्टोन्मेंट बोर्डाची आर्थिक परिस्थिती दोलायमान असल्याने प्रशासकीय खर्चात काटकासर करण्यासह जीएसटीची थकीत रक्कम मिळविण्यासाठी प्रयटन केले जातील. बोर्डाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आगामी काळात करवाढ करण्याबाबत विचार केला जाईल, असे सावंत यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like