Dehuroad : रावण टोळीच्या सदस्याला पिस्तुलासह अटक

एमपीसी न्यूज – कुप्रसिद्ध रावण टोळीच्या एका सदस्याला बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतूसे जप्त केले आहे. ही कारवाई देहूरोड पोलिसांनी केली.

सागर मलकारसिद्ध परीट (वय 23, रा. घरकुल, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई सचिन शेजाळ यांना माहिती मिळाली की, एक इसम रावेत बीआरटी रोड अप्पूघर येथे गावठी कट्ट्यासह फिरत आहे. त्यानुसार, पोलिसांनी परिसरात सापळा रचून सागर याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूसे आढळून आली आहेत. पोलिसांनी हा ऐवज जप्त केला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद गज्जेवार, उपनिरीक्षक अशोक जगताप, पोलीस कर्मचारी प्रशांत पवार, प्रमोद उगले, मयूर जगदाळे, सचिन शेजाळ, किशोर परदेशी, विजय गेंजगे, सुमित मोरे, संकेत घारे, विकी खोमणे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.