BNR-HDR-TOP-Mobile

Dehuroad : अतिक्रमण करून जागा मालकाला जागेत येण्यास मज्जाव

एमपीसी न्यूज – जागेवर अतिक्रमण केले. त्यानंतर अतिक्रमण केलेल्या जागामालकाला त्याच्याच जागेत येण्यास मज्जाव केला. याबाबत तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 22 जुलै रोजी रावेत येथे घडली.

अतिश मोहन भालसिंग आणि त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विनोद तुकाराम अडसर (वय 45, रा. आकुर्डी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद यांची रावेतमधील सर्व्हे नंबर 203 येथे जागा आहे. त्या जागेमध्ये असलेला त्यांच्या ऑफिसचा बोर्ड आरोपींनी तोडला. तसेच जमिनीवर केलेल्या कोबाची तोडफोड केली. जागेवर अतिक्रमण करून विनोद यांना अतिक्रमण केलेल्या जागेत येण्यास रोखले.

स्वतःच्याच जागेत विनोद यांनी येऊ देत नसल्याने तसेच मोडतोड करून अतिक्रमण केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3