Dehuroad : कारमधून जाणा-या दोघांना बेदम मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – कारमधून जाणा-या दोघांना अडवून शिवीगाळ केली. शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्यानंतर दोघांना बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 10) दुपारी साडेबारा वाजता ए बी कॅम्प जवळ, देहूरोड येथे घडली.

सुशांत जालिंदर पोकळे (वय 24, रा. पाण्याच्या टाकीजवळ, देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अनोळखी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोकळे आणि त्यांचा मित्र अक्षय माने कारमधून जात होते. दोन अनोळखी आरोपी दुचाकीवरून आले. त्यांनी फिर्यादी यांच्या कारला थांबवून शिवीगाळ केली. त्यानंतर, फिर्यादी यांनी दोन अनोळखी इसमांना ए बी कॅम्प येथे नेऊन शिवीगाळ करण्याचा जाब विचारला.

फिर्यादी यांचा मित्र अक्षय माने याने जाब विचारात असताना एकाच्या मानेवर हाताने मारले. त्यांनतर आरोपी आणि त्याच्या पाच साथीदारांनी फिर्यादी आणि त्यांच्या मित्राला गज, काठी, दगडाने आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.