Dehuroad : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज- ओळखीच्या बहाण्याने घरात आलेल्या नराधमाने आठ वर्षाच्या मुलीशी लैगिक चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी रविवारी (दि.३१) देहूरोड पोलिसांनी आरोपीला अटक केली.

या प्रकरणी पीडितेच्या ३० वर्षीय आईने फिर्याद दिली असून नवजीवन यादवराव काकड (वय ३०, रा.माळवाडी, देहूगाव) असे अटक आरोपीचे नाव आहे.

काकड हा फिर्यादी यांच्या पतीचा मित्र असल्याने घरी येत असे. त्याने फिर्यादी यांच्या आठ वर्षीय मुलीला खेळण्याच्या बहाण्याने जवळ बोलवले. त्यानंतर तिच्याशी लैंगिक चाळे केले. मुलीने हा प्रकार आईला सांगितला असता त्यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यानुसार देहूरोड पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.