Dehuroad : दुरुस्ती आणि देखरेखीच्या कामासाठी शेलारवाडी-देहूरोड रेल्वे फाटक आजपासून तीन दिवस बंद

Dehuroad: Shelarwadi-Dehuroad railway crossing closed for three days from today for repair and maintenance work

एमपीसी न्यूज – दुरुस्ती आणि देखभालीच्या कामांसाठी शेलारवाडी-देहूरोड रेल्वे फाटक आज, शुक्रवार पासून तीन दिवस बंद राहणार आहे. याबाबतची माहिती पुणे रेल्वे मंडळाकडून देण्यात आली आहे.

रेल्वे विभागाकडून रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर आणि अन्य प्रकारची दुरुस्ती व देखभालीची कामे केली जात आहेत. त्यामुळे शेलारवाडी-देहूरोड रेल्वे स्थानकांच्या दरम्यान असलेले रेल्वे फाटक (रेल्वे फाटक क्रमांक 53) शुक्रवार (दि. 15) ते रविवार (दि. 17) या कालावधीत बंद राहणार आहे.

शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.