Dehuroad : धक्कादायक ! अपहरण करून तरुणीवर लैंगिक अत्याचार

Shocking! Kidnapping and sexual abuse of a young woman : आरोपी साजन आणि अनिकेत यांनी पट्ट्याने व लाथाबुक्क्यांनी तिला मारहाण केली.

एमपीसी न्यूज – मेडिकलमध्ये औषधे आणण्यासाठी जात असलेल्या तरुणीचे अपहरण करून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करण्यात आला. त्यानंतर तिला मारहाण करून मारहाण करताना मोबईल फोनमध्ये व्हिडीओ काढल्याचा धक्कादायक प्रकार देहूरोड येथे उघडकीस आला आहे.

याबाबत तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 22) सकाळी साडेसह वाजता मुंबई-पुणे महामार्गावर देहूरोड परिसरात घडली.

साजन मन्नू मेहरा (वय 27), अनिकेत रणवीर झिंजोड (वय 22), रोहन राजेंद्र टाक (वय 18) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पीडित तरुणीने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी बुधवारी सकाळी साडेसहा वाजता औषधे आणण्यासाठी मेडिकलमध्ये जात होती.

त्यावेळी आरोपींनी तिला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून नेले. पुणे-मुंबई महामार्गावर नेऊन तिच्यावर आरोपी साजन याने लैंगिक अत्याचार केला.

त्यानंतर आरोपींनी तरुणीला दुचाकीवरून टीसी कॉलनी येथे आणले. तेथे आरोपी साजन आणि अनिकेत यांनी पट्ट्याने व लाथाबुक्क्यांनी तिला मारहाण केली.

तसेच मारहाण करताना आरोपी रोहन याला मोबईलमध्ये शूटिंग करण्यास सांगितले.

याबाबत तिघांवर भारतीय दंड विधान कलम 376 (1), 366, 324, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.