BNR-HDR-TOP-Mobile

Dehuroad : प्रभारी अधिकारी म्हणून स्वतःची सही करणारा पोलीस कर्मचारी निलंबित

एमपीसी न्यूज – प्रभारी अधिकाऱ्याच्या परस्पर स्वतःची सही करून न्यायालयाला अहवाल सादर केला. याप्रकरणी एका पोलीस कर्मचाऱ्याचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

पोलीस नाईक विष्णू लांडे असे निलंबन करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

विष्णू लांडे देहूरोड पोलीस ठाणे येथे समन्स अंमलदाराचे कर्तव्य पार पाडत होते. एका गुन्ह्यामध्ये न्यायालयाने साक्षीदारास तब्बल 14 वेळा साक्षी समन्स बजावले होते. मात्र, लांडे यांनी साक्षीदारातर्फे विविध कारणे नमूद करून त्या समन्सवर प्रभारी अधिकाऱ्याऐवजी स्वतःची सही केली व तो अहवाल परस्पर न्यायालयात सादर केला. ही बाब निदर्शनास आल्यानंतर याबात चौकशी करण्यात आली. अधिक चौकशीमध्ये लांडे यांना सहीचा अधिकार नसतानाही त्यांनी अहवाल पाठवल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांना सेवेतून निलंबित करून मुख्यालयाशी संलग्न करण्यात आले आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3