Dehuroad Crime News : दारू पिऊन सासूचा विनयभंग करणारा जावई अटकेत

एमपीसी न्यूज – एका मद्यपी जावयाने सासरवाडीत जाऊन धिंगाणा घातला. घरातील साहित्याची तोडफोड करून सासूशी गैरवर्तन करत विनयभंग केला. याप्रकरणी जावयाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 3) देहूरोड येथे घडली.

याप्रकरणी पीडित सासूने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पंचवीस वर्षीय जावयाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जावयाने दारू पिऊन सासरच्या घराचे गेट तोडले. घरात प्रवेश करून सामानाची तोडफोड केली. तसेच फिर्यादी सासूसोबत गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. तसेच त्यांना तुमची मुलगी मला आताचे आता द्या, असे बोलून शिवीगाळ व दमदाटी केली. पोलिसांनी जावयाला अटक केली आहे.

देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.