Dehuroad : दारू पिऊन आईला त्रास देणाऱ्या वडिलांचा खून; मुलाला अटक

एमपीसी न्यूज – दारू पिऊन आईला त्रास देत असल्याने मुलाने वडिलांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये वडिलांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 16) रात्री साडेदहाच्या सुमारास विठ्ठलवाडी देहूगाव येथे घडली. पोलिसांनी मुलाला अटक केली आहे.

संतोष विठ्ठल येळवंडे (वय 47) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. विराज संतोष येळवंडे (वय 20) असे अटक केलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी आई कविता संतोष येळवंडे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष रविवारी रात्री दारू पिऊन पत्नी कविता यांना मारहाण करीत होते. आईला मारहाण करत असल्याने मुलगा विराज याने संतोष यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये संतोष गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

देहूरोड पोलिसांनी आई कविता यांची फिर्याद घेत मुलगा विराज याला अटक केली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.