BNR-HDR-TOP-Mobile

Dehuroad : भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण; आरोपी अटकेत

720
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – खुर्ची खरेदी करताना किरकोळ कारणावरून सुरु असलेली भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवारी (दि. 19) रात्री आठच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

प्रल्हाद राजुजी दायमा (वय 25, रा. चिखली) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार प्रभाकर बबनराव लांडगे (वय 35, रा. तळवडे) या आरोपीला अटक केली आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री फिर्यादी प्रल्हाद यांचे भाऊ अनिल दायमा यांची आणि आरोपीची खुर्ची खरेदी करताना भांडण झाले. हे भांडण सोडविण्यासाठी प्रल्हाद गेले असता आरोपीने प्रल्हाद यांना शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण केली.

तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या हाताला दुखापत केली. प्रल्हाद यांच्या रिक्षाचे देखील नुकसान केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.