Dehuroad : उप डाकपालास सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

एमपीसी न्यूज – देहूरोड टपाल कार्यालयातील तत्कालीन उप डाकपाल रवींद्र सोमनाथ अहिरराव यास (Dehuroad) न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी आणि तीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. खातेधारकांच्या खात्यातील रकमेचा अपहार केल्याप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.

अहिरराव याने सेन्ट्रल डेपोतील कर्मचाऱ्यांच्या विविध खात्यांमध्ये एसबी, आरडी, एमआयएस, टीडी आणि सुकन्या समृद्धी खात्यातील रकमेचा अपहार केला. सीओडी देहूरोड येथील टपाल खात्यातून अहिरराव याची बदली झाल्यानंतर नवीन पोस्ट मास्तरांना खातेधारकांच्या खात्यात गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले.

Pimpri : सांगवीतील संजय शितोळे यांची लंडन ते पॅरीस 24 तासात सायकलवारी

टपाल खात्याने सुरुवातीला या प्रकरणाची अंतर्गत चौकशी केली. त्यानंतर (Dehuroad) अधीक्षक बी पी एरंडे यांनी 87 लाख 91 हजार 538 रुपयांच्या गैरव्यवहाराची तक्रार सीबीआयकडे केली.

त्यानंतर याप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयात हे प्रकरण चालले. सीबीआयचे विशेष न्यायाधीश ए एस वाघमारे यांनी या प्रकरणी आदेश दिले. विशेष सरकारी वकील म्हणून अभयराज अरीकर यांनी काम पाहिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.