Dehuroad : वरिष्ठ पोलीस अधिकारी सुवेझ हक यांची चौकशी करण्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाचे आदेश

माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजित रमेशन यांनी केली होती मागणी

एमपीसी न्यूज- तत्कालीन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजित रमेशन यांनी मागणी केली होती.

श्रीजित रमेशन यांच्या तक्रारअर्जाची दखल घेत केंद्रीय गृहमंत्रालयाने महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवांना तत्कालीन पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांची चौकशी करून अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. वरिष्ठांच्या दबावामध्ये काम करणाऱ्या सुवेझ हक यांची चौकशी व्हावी अशी मागणी श्रीजित रमेशन यांनी केंद्रीय सतर्कता आयोग आणि केंद्रीय गृह मंत्रालयाकडे केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.