Dehuroad : देहूगावमध्ये मिठाईचे दुकान फोडले; सव्वातीन लाखांची रोकड लंपास

एमपीसी न्यूज –  देहूगाव येथील परंडवाल चौकात असलेले श्री महाराजा मिठाईवाला हे दुकान  (Dehuroad) अज्ञातांनी फोडले. दुकानातून                तीन लाख 20 हजारांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली आहे. ही घटना रविवारी (दि. 7) सकाळी उघडकीस आली.
याप्रकरणी खेताराम भंराराम देवासी (वय 32, रा. परंडवाल चौक, देहूगाव) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Pimpri: धक्कादायक! कंपनीतील सामोसामध्ये आढळला निरोध आणि तंबाखूजन्य गुटखा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देवासी यांचे परंडवाल चौकात (Dehuroad) श्री महाराज मिठाईवाला हे दुकान आहे. त्यांनी शनिवारी (6 एप्रिल ) रात्री दहा वाजताच्या सुमारास दुकान कुलूप लावून बंद केले. शनिवारी (6 एप्रिल ) रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानाच्या काउंटर मधून तीन लाख 20 हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेले. देहूरोड पोलीस  पुढील  तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.