Dehuroad : बाजारपेठेतील अवैध बांधकामांसह वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करा- मनसेची मागणी

Take action against those who cut down trees with illegal constructions in the market - demand of MNS

एमपीसीन्यूज : देहूरोड बाजारपेठेतील सुभाष चौक परिसरात सध्या अवैध बांधकामे सुरु आहेत. दुरुस्तीच्या नावाखाली येथे मोठमोठी पक्की बांधकामे सुरु असून, यातील या बांधकामासाठी अडथळा ठरणारे वृक्ष कोणतीही परवानगी न घेता तोडण्यात आले आहे. त्यामुळे या अवैध बांधकामांसह बेकायदेशीररित्या वृक्षातोड करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मनसेचे मावळ तालुकाउपाध्यक्ष मोझेस दास यांनी केली आहे.

या बाबत देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , कॅन्टोन्मेंट हद्दीत एखाद्या गरिबाने बांधकाम सुरु केल्यास कॅन्टोन्मेंट बोर्डाचे पथक त्याचे बांधकाम साहित्य जप्त करून घेऊन जाते.

कारण गरिबाकडून मलिदा खायला मिळत नाही. गरीबावर कारवाई केली जाते. याउलट बाजारपेठेत श्रीमंतांकडून  बांधकामाला अडथळा ठरणारे झाड तोडून  अवैध बांधकाम केले जात आहे. या बांधकामावर आणि विनापरवानगी झाड तोडणाऱ्यावर कारवाई करावी; अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा मोझेस दास यांनी दिला आहे.

दरम्यान, बाजारपेठेतील श्रीमंतांनी बांधकाम सुरु केल्यास ते कॅन्टोमेन्ट बोर्डाच्या पथकास किंवा अधिकाऱ्यास दिसत नाही. अशा बांधकामाजवळून जात असतानाही त्याकडे डोळेझाक केली जाते.

या उलट झोपड्पट्टीतील गल्लीबोळात गरिबांचे बांधकाम सुरु असल्यास कॅन्टोन्मेन्टचे अतिक्रमण पथक तिथे कारवाईसाठी पोहोचते. यावरून कॅटोन्मेंट बोर्डाकडून कारवाई करताना गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव केला जात असल्याचा आरोपही दास यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.