BNR-HDR-TOP-Mobile

Dehuroad : मतदारयादीतून नऊ हजार नावे वगळणाऱ्यांना धडा शिकवा -सुनील शेळके

एमपीसी न्यूज – देहूरोड परिसरातील सुमारे नऊ हजार मतदारांचा मतदानाचा हक्क या सत्ताधाऱ्यांनी हिरावून घेतला आहे, असा गंभीर आरोप मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी- मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शंकरराव शेळके यांनी केला. मतदारयादीतून नऊ हजार नावे कमी करणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय तुम्ही गप्प बसू नका. त्यांना तुम्ही घरी बसवा, असे आवाहनही शेळके यांनी मतदारांना केले.

अमरजाई देवीची आरती करून शेलारवाडी, देहूरोड भागातील पदयात्रेला सुनील शेळके यांनी सुरुवात केली. इंद्रायणी दर्शन, मामुर्डी, गहुंजे व देहूरोड बाजारपेठत पदयात्रा काढून त्यांनी मतदारांशी संवाद साधला. संपूर्ण देहूरोड परिसरात सुनीलआण्णांचे उत्स्फूर्त स्वागत झाले.

पदयात्रेत तळेगावचे नगरसेवक किशोर भेगडे, देहूरोड काँग्रेसचे अध्यक्ष हाजीमलंग मारीमुत्तू, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अॅड. कृष्णा दाभोळे, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष अॅड. प्रवीण झेंडे, यदुनाथ डाखोरे, काँग्रेसचे कार्याध्यक्ष दीपक साई सर, उपाध्यक्ष व्यंकटेश कोळी, जावेद शकीलकर, काँग्रेसच्या महिलाध्यक्ष ज्योती वैरागर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलाध्यक्ष शीतलताई हगवणे, रिपब्लिकन पक्षाचे कावडे गटाचे शहराध्यक्ष परशुराम दौडमनी, मनसेचे ज्येष्ठ नेते मोझेस दास, मनसेचे शहराध्यक्ष जॉर्ज दास, एसआरपी देहूरोड शहराध्यक्ष जावेद शेख तसेच गणेश कोळी, मिकी कोचर, योगेश दाभोळे, रेणू रेड्डी, बाळूअण्णा पिंजण, यशोदा भंडारी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सुनील शेळके म्हणाले की, मला फक्त एक संधी द्या, हा सुनील शेळके पुढची पाच वर्षे मेहनत करून तुम्हांला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही.  देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील गावांना छोट्या- छोट्या गोष्टींसाठी सुध्दा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. देहूरोड परिसरात आपल्याला विकास करायचा आहे. या भागातील लोकांना स्वच्छतागृहे, तरुणांना रोजगार, येथील महिलांचे सक्षमीकरण करायचे आहे अनेक सरकारी योजना आपल्याला येथील नागरिकांना मिळवून द्यायच्या आहेत.

देहूरोडमधील नागरिकांनी कोणाच्याही दबावाला घाबरू नका. आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत, असे किशोर भेगडे यांनी सांगितले.

शेलारवाडीत पदयात्रेत सतीश भेगडे, संजय माळी, योगेश माळी, साईनाथ शेलार, प्रदीप चांदेकर, संजय शेलार, माऊली बालघरे तसेच शिवतेज ग्रुप, संत सावतामाळी मित्र मंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. गहुंजे येथे उमेश बोडके, लखन बोडके, विक्रम बोडके, माऊली बोडके तर, मामुर्डी येथे रोहिदास राऊत, मोहन राऊत, दत्तात्रय राऊत, स्वप्नील राऊत, वैभव राऊत आदींनी शेळके यांचे स्वागत केले.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like