Dehuroad : दुरुस्तीसाठी गॅरेजसमोर पार्क केलेली रुग्णवाहिका चोरीला

एमपीसी न्यूज – दुरुस्तीसाठी रुग्णवाहिका गॅरेजसमोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी क्रेनच्या सहाय्याने टोइंग करून  ती चोरून नेल्याची घटना 1 मे रोजी रुपीनगर येथे घडली. याबाबत 18 दिवसानंतर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

संजय रंजीत सहा (वय 26. रा. रुपीनगर, ता. हवेली) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. फिर्यादी संजय यांनी त्यांची   तीन लाख रुपये किंमतीची रुग्णवाहिका (एनएच 14 / सीडब्ल्यू 0248)  रुपीनगर येथील एका गॅरेज समोरील मोकळ्या जागेत पार्क करून ठेवली होती.

अज्ञात चोरट्यांनी क्रेनच्या सहाय्याने टोइंग करून त्यांची रुग्णवाहिका चोरून नेली. त्यानंतर संजय यांनी स्वतः काही दिवस रुग्णवाहिकेचा शोध घेतला. मात्र, त्यांना रुग्णवाहिका मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.