Dehuroad : विनाकारण मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा; एकाला अटक

एमपीसी न्यूज – तरुणाला विनाकारण मारहाण केल्याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी यातील एका आरोपीला अटक केली आहे. ही घटना बुधवारी (दि. 13) रात्री सव्वा सातच्या सुमारास साईनगर, देहूरोड येथे घडली.

कादिर कलीम खान (वय 19, रा. साईनगर देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह अरबाज शेख, जोयल तिलानी, प्रशांत विरण (सर्व रा. देहूरोड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी धर्मेंद्र राजू यादव (वय 18 रा. साईनगर, देहूरोड) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास आरोपी आलिशान कार मधून (एमएच 43 एक्स 8548) आले. आरोपींनी विनाकारण फिर्यादी धर्मेंद्र आणि त्यांचे आजोबा रामसरण प्रभू यादव यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

त्यानंतर फिर्यादी यांचे आजोबा रामसरण यांना आरोपींनी दगड विटांनी तोंडावर मारून गंभीर जखमी केले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.