Dehuroad : बांधकाम व्यावसायिकावर पावणे सहा कोटींचे नुकसान केल्याचा गुन्हा

एमपीसी न्यूज – कारारनाम्यानुसार बांधकाम (Dehuroad) न करून देता तब्बल पावणे सहा कोटींचे नुकसान केल्याचा गुन्हा देहुरोड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. हा सारा प्रकार 19 सप्टेंबर 2016 पासून सुरू होता.

याप्रकरणी अभिमन्यू एकनाथ काळोखे (वय 48 रा. निगडी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तुषार सत्यविजय हेड ( वय 42 रा.दापोडी) व महिला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Alandi : आळंदीमध्ये धर्मपरिवर्तनाच्या नावाखाली धक्कादायक प्रकार; गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व तुषार खेडा याच्या कस्तुरी डेव्हलपर्स यांच्यात 2016 साली विकसन करारनामा झाला होता. मात्र तेव्हापासून आजपर्यंत करारनाम्यानुसार विकास न करता त्यातील अटींचा आरोपीने भंग केला आहे. फिर्यादीच्या फसवणूक करत फिर्यादीच्या 32 प्लॉटचे 5 कोटी 76 लाख रुपयांचे नुकसान केले आहे. याबाबत आरोपीला विचारणा केली असता उलट धमकी देत असल्याने देहूरोड (Dehuroad) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.