Dehuroad : जॉगिंगसाठी गेलेल्या तरुणीची सोनसाखळीसह मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज – सकाळी जॉगिंग करण्यासाठी बाहेर गेलेल्या तरुणीच्या गळ्यातील सोन्याची साखळी, मोबाईल फोन आणि हेडफोन अज्ञात चोरट्याने जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना रविवारी (दि. 15) पहाटे पाचच्या सुमारास निगडी प्राधिकरण येथे घडली.

सुवर्णा दत्तात्रय पाटील (वय 30, रा. निगडी) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार एका चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुवर्णा रविवारी पहाटे जॉगिंग करण्यासाठी बाहेर गेल्या. सेक्टर 26 मधील परमार पार्क येथे जॉगिंग करत असताना मागून आलेल्या एका चोरट्याने त्यांच्या गळ्यातील साडेसात ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी, मोबाईल फोन आणि हेडफोन असा एकूण 17 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. देहूरोड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.