Dehuroad Crime News : रस्त्यात धोकादायकरित्या थांबलेल्या ट्रकला धडकून दुचाकीस्वार ठार

एमपीसी न्यूज – रस्त्यात धोकादायकरीत्या पार्क केलेल्या ट्रकला दुचाकीस्वाराची धडक बसली. त्यात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 14) सायंकाळी सव्वापाच वाजता रावेत येथे घडली.

भूषण चंद्रकांत कदम (वय अंदाजे 30, रा. वडगाव मावळ) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. आर ज्योती रामलिंग (वय 40, रा. मेटूर, ता. आंदूर, जि. इरोड, तामिळनाडू) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सहाय्यक पोलीस फौजदार नितीन चौधरी यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रामलिंग याने त्याच्या ताब्यातील ट्रक (टी एन 52 / एक्स 6868) पुणे-मुंबई महामार्गावर रावेत येथे रुणाल स्पेसिको सोसायटी समोर रस्त्यावर धोकादायकरीत्या पार्क केला. ट्रकचे पार्किंग लाईट न लावल्याने ट्रक थांबवल्याचे दिसत नव्हते.

दरम्यान, त्या मार्गावरून मयत भूषण त्यांच्या दुचाकीवरून (एम एच 12 / जी एक्स 4225) जात होते. रावेत येथे आरोपी रामलिंग याच्या ट्रकला भूषण यांच्या दुचाकीची मागून जोरात धडक बसली. त्यात भूषण यांच्या तोंडाला, डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यातच भूषण यांचा मृत्यू झाला.

देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.