BNR-HDR-TOP-Mobile

Dehuroad : टोळक्‍याकडून युवकाला बेदम मारहाण

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – बारा जणांच्या टोळक्याने एका युवकाला लोखंडी रॉड आणि पाईपने गंभीर मारहाण केली. ही घटना मंगळवारी रात्री 8 च्या सुमारास देहूरोड येथे घडली.

सचिन अशोक निकम (वय 31, देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आकाश, सत्वेल चिन्नास्वामी, मदन चिन्नास्वामी उर्फ टोकल, चिंझी, शहशहा आणि अन्य सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री आठच्या सुमारास बारा जणांचे टोळके सचिन यांच्या घरासमोर आले. त्यांनी सचिन यांना लोखंडी रॉड पाईपने मारहाण केली. यामध्ये सचिन गंभीर जखमी झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.
HB_POST_END_FTR-A2

.