Dehuroad : कॅन्टोन्मेंट हद्दीतील ‘हा’ परिसर आजपासून ‘मायक्रो कंटेन्मेंट झोन’

शनिवारपासून ( दि. 8) पुढील 14 दिवसांच्या कालावधीसाठी हा परिसर मायक्रो कंटेन्मेंट झोन असेल. : This' area within the cantonment Area 'Micro Cantonment Zone' from today

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील थॉमस कॉलनी, शितलानगर नं 1. , शितलानगर नं. २, आंबेडकर नगर, गांधीनगर आणि पारशी चाळ या भागामध्ये कोरोनाचे रुग्ण सातत्याने आढळून येत असल्याने हा भाग आज, शनिवारपासून ( दि. ८) ‘मायक्रो कंटेन्मेंट झोन’ म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती   बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर रामस्वरूप हरितवाल यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून थॉमस कॉलनी, शितलानगर नं 1. , शितलानगर नं. २, आंबेडकर नगर, गांधीनगर आणि पारशी चाळ या भागामध्ये कोरोनाचे रुग्ण सातत्याने आढळून येत आहेत.

या भागातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा परिसर मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. शनिवारपासून ( दि. 8) पुढील 14 दिवसांच्या कालावधीसाठी हा परिसर मायक्रो कंटेन्मेंट झोन असेल.

आजपासूनच हा परिसर सील करण्यात आला आहे. तसेच हा भाग नियंत्रण कक्षाखाली घेण्यात आला असून या भागात निर्जंतुकीकरण केले जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुणीही विनाकारण घराबाहेर पडू नये. तसेच आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर हरितवाल यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.