Dehuroad : परराज्यातील तरुणाकडे लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तिघांना अटक

एमपीसी न्यूज – परराज्यातील तरुणाला जंगलात नेऊन मारण्याची धमकी दिली. तसेच एक लाख रुपयांची खंडणी मागितली. ही घटना शनिवारी (दि. 14) सकाळी देहूरोड येथे घडली. याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.

संकल्प संजय पगारे (वय 19, रा. मामुर्डी), योगेश किसन बुरकुंडे (वय 19, रा. किवळ, शुभम शांतीलाल चव्हाण (वय 20, रा. तळेगाव दाभाडे) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी आकाश नंदकुमार मिश्रा (वय 24, रा. किवळे) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी आकाश यांना कामाच्या बहाण्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक देहूरोड यांच्या कार्यालयाजवळ बोलावून घेतले. त्यानंतर आरोपींनी कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या जंगलात आकाश यांना नेले.

आरोपी शुभम याने ‘तुम बाहर से आकर इतना कमाते हो, जान प्यारी है तो एक लाख रुपये दे दो’ अशी धमकी देत खंडणीची मागणी केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.