Dehuroad : विनाकारण मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – तरुणाला विनाकारण मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 1) पहाटे साडेबाराच्या सुमारास जय मातादी ऑटो गॅरेज, देहूरोड येथे घडली.

अजय बाला, अविनाश बाला, नागेश (पूर्ण नाव माहिती नाही, सर्व रा. एम बी कॅम्प, देहूरोड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सुधीर व्यंकटेश तेलगू (वय 20, रा. शितळानगर, देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे साडेबाराच्या सुमारास फिर्यादी सुधीर त्यांचा चुलत भाऊ उमेश आदिनारायण बोया याला घेण्यासाठी जय मातादी ऑटो गॅरेज, देहूरोड येथे गेले. त्याला घेऊन येत असताना आरोपींनी संगनमत करून सुधीर यांना हाताने, लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण केली. यामध्ये सुधीर जखमी झाले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.