Dehuroad : विनापरवाना दारू हुक्का विक्री प्रकरणी तिघांना अटक

एमपीसी न्यूज – विनापरवाना हॉटेलमध्ये दारू आणि हुक्का विक्री ( Dehuroad ) केली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 1) दुपारी पावणे एक वाजताच्या सुमारास हॉटेल ग्लॅमर 24 किवळे येथे करण्यात आली.

रविकुमार योगेश्वर दास (वय 28), दीपक ज्योतिबा पन्हाळकर (वय 34), मनोज रामदुलारे चौधरी (वय 23, तिघे रा. ग्लॅमर हॉटेल 24, किवळे) अशी अटक केलेले आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार बाळासाहेब नंदुर्गे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Nigdi : दुचाकीच्या धडकेत पादचारी मुलगी जखमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्या हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे विनापरवाना दारू, हक्काचे साहित्य आणि हुक्का फ्लेवर बाळगला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हॉटेलवर कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 29 हजार रुपये किमतीचे दारू, हुक्का साहित्य आणि हुक्का फ्लेवर जप्त केले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत ( Dehuroad ) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.