Dehuroad : कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

Today 3 corona positive patients in the cantonment area

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील समर्थनगरी, इंद्रप्रस्थ बिल्डिंग आणि पारशी चाळ या भागात एकूण तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आजपर्यंत हद्दीत एकूण 88 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या आज, बुधवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल दिला आहे. त्यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील समर्थनगरी, इंद्रप्रस्थ बिल्डिंग आणि पारशी चाळ या भागात एकूण तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे.

तर सहा जणांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत हद्दीत एकूण 88 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यापैकी सध्या 17 रुग्ण रुग्णालयात दाखल असून, 11 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटर येथे 18 रुग्ण उपचार घेत आहेत. तर आजपर्यंत कोरोना आजारातून बरे झालेल्या एकूण 38 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

दरम्यान, आजपर्यंत फक्त कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील 4 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.