Dehuroad : पारशी चाळसह विविध भागात आज 9 जणांना कोरोनाची बाधा

Today 9 people in different areas including Parsi Chawla hit the corona : कॅन्टोन्मेंट हद्दीत एकूण 236 पॉझिटिव्ह रुग्ण

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील पारशी चाळ, थॉमस कॉलनी, गांधीनगर, मामुर्डी , चिंचोली, राजीव गांधीनगर या परिसरात आज, शनिवारी एकूण 9 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पारशी चाळ परिसरात दररोज कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. कॅन्टोन्मेंट प्रशासनाने हा परिसर मायक्रो कंटेन्मेन्ट झोन जाहीर केला आहे.

त्यामुळे आजपर्यंत हद्दीत एकूण 236 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज, शनिवारी रात्री नऊ वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे. त्यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज 9 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाल्याचे म्हटले आहे. रुग्णवाढीचे प्रमाण झोपडपट्टी परिसर जास्त असल्याचे या अहवालातून स्पष्ट होत आहे.

आजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत एकूण 236 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यापैकी सध्या 26 रुग्ण रुग्णालयात दाखल असून, 98 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटर येथे 33 रुग्ण उपचार घेत आहे. या सर्वांची प्रकृती चांगली असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या अहवालात म्हटले आहे.

दरम्यान, आजपर्यंत कोरोना आजारातून बरे झालेल्या एकूण 74 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजपर्यंत कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील 5 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता जोशी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.