Dehuroad Traffic Update: देहूरोड उड्डाणपुलावर पाणी साठल्याने मंदावली महामार्गावरील वाहतूक

Dehuroad Traffic Update: Traffic on Pune-Mumbai Highway moves slow due to water logging on Dehuroad flyover. देहूरोड येथे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर नवीन बांधलेल्या उड्डाणपुलावर पुण्याकडे जाणाऱ्या बाजूला काही भागात पाणी साठल्याने जणू नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यातून वाहने पुढे काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.

एमपीसी न्यूज – काल रात्री झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने देहूरोड उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक मंदावली आहे. पहिल्याच पावसात उड्डाणपुलावर ही अवस्था झाल्यामुळे वाहनचालकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
देहूरोड येथे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर नवीन बांधलेल्या उड्डाणपुलावर पुण्याकडे जाणाऱ्या बाजूला काही भागात पाणी साठल्याने जणू नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यातून वाहने पुढे काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. अनेक दुचाकी वाहने बंद पडल्याने दुचाकीस्वारांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

उड्डाणपुलावर साठलेल्या या पाण्याचा लवकरात लवकर निचरा होण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी वाहनचालकांची मागमी आहे.  मान्सूनचे आगमन होण्यापूर्वी देहूरोडमध्ये काही उपाययोजना व नियोजन करण्यात आल्याचे दिसून येत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

एमपीसी न्यूजचे देहूरोड येथील नियमित वाचक संजय डुमडे यांनी देहूरोड उड्डाणपुलावर पाणी साठल्याचे फोटो आणि व्हिडिओ एमपीसी न्यूजला उपलब्ध करून दिले. या प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.