BNR-HDR-TOP-Mobile

Dehuroad : ‘वृक्ष लावा, वृक्ष जगवा’ या मोहिमेअंतर्गत शेलारमळा येथे वृक्षारोपण

एमपीसी न्यूज – नगरसेवक रघुवीर शेलार स्नेह ग्रुप व आकुर्डी येथील पिंपरी-चिंचवड पॉलिटेक्निक कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने शेलारवाडी शेलारमळा येथे ‘वृक्ष लावा, वृक्ष जगवा’ या मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.

त्याप्रसंगी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष रघुवीर उद्धवराव शेलार व पिंपरी- चिंचवड पॉलिटेक्निकच्या प्राचार्या विद्या ब्यकोड, प्रा. बी. व्ही. माने प्रा. मंगला माळकर, प्रा. अलका अवस्थी, प्रा. मोरतळे, प्रा. सुनील गांधी, प्रा. पुष्प केतन देवतळे, प्रा. ए. व्ही. रायपुरे तसेच इतर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, सचिव व्ही. एस. काळभोर, कोषाध्यक्ष शांताराम गराडे, त्याचप्रमाणे भाईजान काझी, पद्माताई, गिरीश देसाई यांचे मार्गदर्शन मिळाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आयोजन प्रा. मनोज वाखारे यांनी केले व आभार अनिल शेलार यांनी मानले. स्थानिक नागरिकांच्या देखील उपस्थिती लक्षणीय होती आणि त्यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

Advertisement