Dehuroad : कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने शहीद जवानांना श्रद्धांजली
Tribute to the martyred soldiers on behalf of the Cantonment Board

एमपीसी न्यूज : लडाख येथील गालवानमध्ये चिनी सैनिकांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 20 भारतीय जवान शहीद झाले. देहूरोड कॅन्टोमेन्ट बोर्डाच्या वतीने या शहीद जवानांना नुकतीच श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला.

देहूरोड कॅन्टोमेन्ट बोर्ड कार्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल, नगरसेवक हाजीमलंग मारीमुत्तू, अॅड. अरुणा पिंजण, विशाल खंडेलवाल, गोपाळ तंतरपाळे आदींसह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी चिनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला.