Dehuroad : गहुंजे आणि किवळे येथे मोबाईल हिसकावण्याच्या दोन घटना

एमपीसी न्यूज – किवळे येथे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोन महिलांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांचा मोबाईल हिसकावून नेला. तर गहुंजे येथे रस्त्यावर उभ्या असलेल्या एका नागरिकाचा मोबाईल हिसकावून नेला. या प्रकरणी दुचाकीवरील तीन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिल्या घटनेत एका महिलेने बुधवारी (दि. 18) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील तीन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास कुणाल ऐकोनिया ते गहुंजे स्टेडियम येथून फिर्यादी महिला आणि तिची मैत्रीण अशा या दोघीजणी मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी फिर्यादी महिलेला कोयत्याचा धाक दाखवला. “मोबाइल दे नाहीतर मारून टाकेल”, अशी धमकी देऊन फिर्यादी यांचा 15 हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत चंद्रकांत दगडू वाघमारे (वय 50, रा. किवळे, देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील तीन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी 6.25 वाजता फिर्यादी हे बेंगलोर बायपास महामार्गावर देहूरोड येथील शिंदे पेट्रोल पंपावर समोरील रस्त्यावर उभे होते. त्यावेळेस दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांपैकी एकजण खाली उतरला. त्याने मोठ्याने ओरडून फिर्यादी यांचे लक्ष विचलित केले. त्यानंतर त्यांच्या हातातील चार हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.