Dehuroad : दोन चोरट्यांनी भरदिवसा दुचाकीस्वार महिलेला अडवून लुटले

एमपीसी न्यूज – दोन चोरट्यांनी भरदिवसा दुचाकीस्वार महिलेला अडवून लुटले. ही घटना बुधवारी (दि. 21) दुपारी साडेचारच्या सुमारास सिद्धिविनायक नगरी निगडी येथे घडली.

गौरी दिलीप राजवाडे (वय 32, रा. दत्तनगर, निगडी) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गौरी निगडीमधील सिद्धिविनायक नगरी येथून दुचाकीवरून जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी गौरी यांची बॅग हिसकावून घेतली. तसेच गौरी यांच्या दुचाकीला धक्का मारून त्यांना खाली पाडून मारहाण केली.

गौरी यांच्या बॅगेतील मोबाईल फोन, बॅग, पर्स आणि कागदपत्रे असा एकूण 13 हजार 600 रुपयांचा ऐवज चोरून नेला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.