BNR-HDR-TOP-Mobile

Dehuroad : लोकलच्या धडकेत इसमाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – लोणावळा-पुणे लोकलच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 18) सायंकाळी साडेसातच्या सुमारास शेलारवाडी येथे घडली.

लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख अद्याप पटली नाही. लोणावळा येथून सायंकाळी 6.20 वाजता सुटणारी लोकल (99821) साडेसातच्या सुमारास शेलारवाडी देहूरोड येथे आली. या लोकलच्या धडकेत व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

अंदाजे 45 वय असून उंची पाच फूट आहे. गव्हाळ रंग, मध्यम बांधा, चेहरा गोल, नाक सरळ आहे. या वर्णनाच्या व्यक्तीबाबत माहिती मिळाल्यास देहूरोड रेल्वे पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3