Dehuroad : फोनवर बोलताना अज्ञाताने मोबाईल फोन हिसकावला; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – रस्त्याच्या बाजूने फोनवर बोलत जात असलेल्या इसमाचा मोबाईल चोरट्याने हिसकावून नेला. ही घटना कोहली गॅस एजन्सी आंबेडकर रोड, देहूरोड येथे घडली.

इस्माईल माहित शेख (वय 32, रा. दत्तनगर, देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इस्माईल बुधवारी (दि. 25) रात्री मोबाईल फोनवर बोलत देहूरोडमधील कोहली गॅस एजन्सी जवळील आंबेडकर रोडने जात होते. अज्ञात चोरटा पळत आला आणि त्यांचा सुमारे आठ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.