Dehuroad : वाहन चोरी करणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज – वाहन चोरी करणाऱ्या एका चोरट्याला देहूरोड पोलिसांनी (Dehuroad )अटक केली. त्याच्याकडून चार दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहे.

रवींद्र सुरेश सातोळे (वय 19, रा. गांधीनगर, देहूरोड) असे अटक केलेल्या (Dehuroad )आरोपीचे नाव आहे.

Pimpri: मी इथला भाई आहे म्हणत तरुणाला बेदम मारहाण 

29 मार्च रोजी देहूरोड मधील स्वामी चौकातून एक दुचाकी चोरीला गेली. याप्रकरणी चंद्रकांत तलारी यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यातील आरोपीचा शोध घेत असताना देहूरोड पोलिसांना शिवाजी विद्यालयाजवळ संशयित आरोपी येणार असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन रवींद्र सातोळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लाख 65 हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.