Dehuroad : किरकोळ कारणावरून महिलेला मारहाण; तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – शेजारी सुरु असलेल्या बांधकामाचे मटेरियल घरावर पडत असल्याचे सांगितल्याने तिघांनी मिळून महिलेला मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 12) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास किवळे येथे घडली.
अलका दिलीप गायकवाड (वय 50, रा. साळुंके वस्ती, किवळे) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजेंद्र गायकवाड, त्यांचा मुलगा व पत्नी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अलका यांच्या घराच्या शेजारी गायकवाड यांचे बांधकाम सुरु आहे. त्या बांधकामाचे सिमेंट कॉँक्रीटचे मटेरियल अलका त्यांच्या घरावर पडत होते. त्यामुळे त्यांनी याबाबत आरोपींना सांगितले. याचा राग मनात धरून राजेंद्र गायकवाड, त्यांचा मुलगा व पत्नीने संगनमत करून महिलेला शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.
