Dehuroad : किरकोळ कारणावरून तीन महिलांकडून एका महिलेला बेदम मारहाण

Woman beaten to death by three women for petty reasons देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे

एमपीसी न्यूज – शेजारी राहणा-या महिलेने तिच्या मोपेड दुचाकीने धक्का देऊन दुचाकी पाडली. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेला तीन महिलांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 24) दुपारी साडेचार वाजता शीतळानगर नंबर एक, देहूरोड येथे घडली.

डमा नंदा बोया (वय 38, रा. शीतळानगर नंबर एक, देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी हेमा शंकर रेड्डी (वय 35), ममता हैमत पिरजावे (वय 25), पार्वती शंकर रेड्डी (वय 50, सर्व रा. शीतळानगर नंबर एक, देहूरोड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकमेकांच्या शेजारी राहण्यास आहेत. आरोपी हेमा हिने तिची स्कूटी बाहेर काढताना फिर्यादी यांच्या दुचाकीला धडक दिली आणि दुचाकी खाली पाडली. याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी गेल्या असता आरोपी ममता हिने लाकडी दांडक्याने मारून जखमी केले. तसेच पार्वती हिने चापटीने मारले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.