Dehuroad : प्रेमसंबंधातून तरुणाची आत्महत्या; तरुणीच्या घरावर दगडफेक

एमपीसी न्यूज – प्रेमसंबंधातून तरुणाने आत्महत्या केली. यातून तरुणाच्या घरच्यांनी तरुणी आणि तिच्या आईला शिवीगाळ करत त्यांच्या घरावर दगडफेक केली. ही घटना शनिवारी (दि. 17) दुपारी देहूरोड येथे घडली.

लक्ष्मी तुकाराम नाईक (वय 40, रा. देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अडुळ, सिन्नो आणि इतर एका इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी यांची मुलगी आणि आरोपी सिन्नो यांचा मुलगा बॉबी या दोघांचे प्रेमसंबंध होते. त्यातून बॉबी याने आत्महत्या केली. याचा राग मनात धरून आई सिन्नो, बॉबीचा मामा अडुळ आणि त्यांचा एक साथीदार यांनी मिळून लक्ष्मी आणि त्यांच्या मुलीला घरासमोर येऊन शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या घरावर दगडफेक करून काचा फोडल्या.

याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.