BNR-HDR-TOP-Mobile

Dehuroad : पादचारी तरुणीला चाकूचा धाक दाखवून लुटले

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी जात असलेल्या तरुणीला तिघांनी चाकूचा धाक दाखवून लुटले. तसेच दगडाने व चाकूने मारून जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. 24) रात्री दुर्गामाता मंदिराजवळ देहूरोड येथे घडली.

आलिशा गुड्डू पांडे (वय 22, रा. गांधीनगर, देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तंबी उर्फ किशन, टिपू, अमीर उर्फ वाडी (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि त्यांचा एक साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांचे मामा देहूरोड येथील दुर्गामाता मंदिराजवळील रस्त्याने पायी चालत जात होते. त्यावेळी चार जणांनी त्यांना रस्त्यात अडवून चाकूचा धाक दाखवून एक हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन हिसकावून घेतला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मामांना लाथाबुक्यांनी, दगडाने व चाकूने मारहाण केली. यामध्ये दोघेजण जखमी झाले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.