Gutka sale case : गुटखा विक्री प्रकरणी तरुणास अटक

एमपीसी न्यूज – विकासनगर येथील एका किराणा दुकानात गुटखा विक्रीसाठी (Gutka sale case) ठेवला असल्याची माहिती मिळाल्याने गुन्हे शाखा युनिट पाचने किराणा दुकानावर छापा मारून कारवाई केली. त्यात पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा जप्त करून दुकानदार तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (दि. 22) रात्री साडेसात वाजता करण्यात आली.

चनाराम मंगीलाल देवासी (वय 26, रा. किवळे, ता. हवेली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई ज्ञानेश्वर गाडेकर यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pcmc Election ward composition : प्रभागरचनेविरुद्ध उच्च न्यायालयात दाद; बुधवारी सुनावणी

पोलिसांनी दिलेल्या (Gutka sale case) माहितनुसार, आरोपीचे विकासनगर येथे किराणा मालाचे दुकान आहे. त्याने दुकानात शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी ठेवला. याबाबत गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी रविवारी रात्री दुकानावर छापा मारून कारवाई केली. त्यात पोलिसांनी तीन हजार 518 रुपयांचा गुटखा जप्त केला. दुकानदार देवासी याला पोलिसांनी याप्रकरणी अटक केली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.