Dehuroad : वाईन शॉप फोडून रोकड लंपास

रावेत येथील प्रथमेश वाईन शॉपी येथे हा प्रकार उघडकीस आला. : Cash stolen breaking into wine shops

एमपीसी न्यूज – वाईन शॉप फोडून अज्ञात चोरट्यांनी 69 हजार रुपयांची रोकड चोरून नेली. हा प्रकार गुरुवारी (दि. 6) सकाळी साडेदहा वाजता रावेत येथील प्रथमेश वाईन शॉपी येथे उघडकीस आला.

याप्रकरणी सोमनाथ पांडुरंग काटे (वय 48, रा. पिंपळे सौदागर, काटेनगर, पुणे) यांनी  देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काटे यांचे रावेत येथे भोंडवे कॉर्नरजवळ प्रथमेश वाईन शॉपी नावाचे दुकान आहे. बुधवारी (दि. 5) सायंकाळी सात वाजता काटे यांनी त्यांचे दुकान बंद केले.

रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या पहिल्या मजल्यावरील काच आणि लोखंडी ग्रील तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातून 69 हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली.

देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.