Dehuroad : कॅन्टोन्मेंट हद्दीत रविवारपासून लॉकडाऊन सौम्य; सकाळी 8 ते दुपारी 12  दुकाने होणार सुरु

Mild lockdown from Sunday in cantonment Area ; shops Starting from 8 a.m. to 12 p.m.; सलून, ब्युटी पार्लर, स्पा बंदच राहणार

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत येत्या रविवारपासून म्हणजेच 19 जुलै ते 23 जुलै या कालावधीसाठी लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे. यामध्ये सलून, ब्युटी पार्लर,स्पा वगळता सर्व दुकाने सुरु करण्यास कॅन्टोन्मेंट प्रशासनाने मुभा दिली आहे.

यासंदर्भात कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीप्रमाणे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, 19  ते 23  जुलै या कालवधीसाठी लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे.

त्यामुळे हद्दीतील किराणा, भाजपाला यासह सर्व प्रकारची दुकाने सुरु ठेवता येतील. सकाळी 8 ते दुपारी 12  या वेळेत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

मात्र, या मध्ये सलून, ब्युटी पार्लर, स्पा या दुकानांना वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर सरकारी कार्यालये, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी, बँक मेडिकल, रुग्णालये पूर्वीप्रमाणे सुरु राहणार असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने कळविले आहे.

दरम्यान, लॉकडाऊन कालावधीत कुणीही विनाकारण घराबाहेर पडू नये, स्वतःसह कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.