Dehurod : देवीदास भन्साळी यांना राज्यपाल नियुक्त आमदार करा : हाजीमलंग मारीमुत्तू

Make Devidas Bhansali Governor-appointed MLA: Hajimalang Marimuttu

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसीन्यूज : गेली 45 वर्ष निरपेक्ष भावनेने काँग्रेस पक्षात काम करणारे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष देविदास भन्साळी यांना काँग्रेस कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून निवड करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे देहूरोड शहराध्यक्ष व देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक हाजीमलंग मारीमुत्तू यांनी केली आहे.

याबाबत मारीमुत्तू यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष, आमदार संजय जगताप, आमदार संग्राम थोपटे यांना निवेदन पाठविले आहे.

देविदास भन्साळी हे गेली 45  वर्ष काँग्रेस पक्षात निष्ठेने व निरपेक्ष भावनेने काम करीत आहेत. भन्साळी यांनी 11  वर्ष काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष पद भूषविले आहे. या कालावधीत पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात काँग्रेसचे जाळे पसरविण्याचे काम त्यांनी केले . ग्रामीण भागात काँग्रेस पक्ष भक्कम करण्याचे कामही भन्साळी यांच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात झाले आहे.

भन्साळी यांनी कधीही काँग्रेस पक्षाकडून कोणतीही अपेक्षा केलेली नाही. त्यामुळे काँग्रेसच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून भन्साळी यांना संधी द्यावी. यामुळे काँग्रेस पक्षात निष्ठावंतांना न्याय मिळतो, असा संदेश जाईल, असे मारीमुत्तू यांनी निवेदनात नमूद केले आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.