Dehurod : चोरटयांनी सार्वजनिक गणेश मंडळासमोरील दानपेटी पळवली!

एमपीसी न्यूज – सार्वजनिक गणेश मंडळासमोरील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी चोरली. ही घटना गुरुवारी (दि. 5) सकाळी साडेसातच्या सुमारास शिंदेवस्ती रावेत येथे उघडकीस आली.

_MPC_DIR_MPU_II

स्वरूप शंकर भोंडवे (वय 28, रा. शिंदेवस्ती, रावेत) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदेवस्ती रावेत येथे असलेल्या सार्वजनिक गणेश मंडळाने गणेशोत्सवात ठेवलेली दानपेटीत आणि त्यातील देणगी असा एकूण 12 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.