Dehugaon : देहूच्या ग्रामविकास अधिकार्‍याला मारहाण

एमपीसी न्यूज – पाण्याची नळजोडणी दुसरीकडे हलविण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना नळजोडणी हलविण्यास मज्जाव करत ग्रामविकास अधिकार्‍याला शिवीगाळ केली. तसेच अंगावर धावून जात त्यांना मारहाण करणार्‍या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता देहूगावातील ग्रामपंचायत कार्यालयात घडली.

राजू शिगवण (वय-36), दत्ता तुकाराम शिगवण (वय-38), मनोहर तुकाराम शिगवण (वय-40, तिघे रा. देहूगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी अर्जुन मरेप्पा गुडसुरकर (वय-52, रा. वाल्हेकरवाडी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचा भाऊ दिलीप शिगवण यांच्या जागेत त्यांच्या पाण्याची नळजोडणी होती. ही हलविण्यासाठी ग्रामपंचायतचे कर्मचारी शुक्रवारी गेले होते. आरोपींनी नळ जोडणी हलविण्यासाठी कर्मचार्‍यांना मज्जाव केला. फिर्यादी यांना फोन करून शिवीगाळ केली. तसेच ग्रामपंचायत कार्यालयात येऊन फिर्यादी यांच्या अंगावर धावून जात धक्काबुक्की करत मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी तिनही आरोपींना अटक केली आहे.  फौजदार मोरे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.