Pimpri News : ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी शिष्टमंडळ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

0

एमपीसी न्यूज – ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी एक शिष्टमंडळ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले. शिष्टमंडळाने फडणवीस यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली.

यावेळी भाजप प्रवक्ते केशव उपाध्याय, विश्वजीत  देशपांडे, संजीवनी पांडे, मनोज कुलकर्णी, मकरंद कुलकर्णी, निखिल लातूरकर, गजानन जोशी तसेच पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, बिड, परभणी, लातूर जिल्ह्यातील सभासद उपस्थित होते.

ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्या घेवून ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळाने बुधवारी (दि. 10) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ब्राह्मण समाज आर्थिक मागासवर्गीय समाज बनला आहे. समाजातील महिला,  विद्यार्थी, पुरोहित वर्ग ह्यांचे प्रश्न मार्गी लावण्यसाठी घटनेत कुठलीही तरतूद नाही. त्यामुळे विविध संघटनांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गेली दहा वर्षे जागरुकता व प्रामुख्याने एकवाक्यता निर्माण केली जात आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ब्राह्मण समाजाने संयमी भूमिका घेतली व त्यांना जातीयवादाच्या कुंपणात जखडले नाही. त्यांनी ही सर्व समावेशक राजकारण करत खुल्या वर्गासाठी ईबीसी लेवल वाढवणे, अमृत योजना आणणे असे निर्णय घेतले.

अमृत योजनेचे वैशिष्ट म्हणजे यामध्ये त्या लाभार्थ्यांचा समावेश होतो, ज्यांना कुठल्याही महामंडळाचा लाभ घेता येत नाही. यासाठी त्यांचे सर्व खुला प्रवर्ग नेहमीच आभारी राहील, असे या भेटीदरम्यान सांगण्यात आले. या प्रसंगी ब्राह्मण समाजाच्या प्रमुख मागण्यांवर साधक बाधक चर्चा करून देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळाला मार्गदर्शक सूचना दिल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment