Delhi : अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा; मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार, जनतेकडून न्यायाची अपेक्षा

एमपीसी न्यूज : दिल्लीचे (Delhi) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे. दोन दिवसांत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी दिल्लीत लवकर निवडणुका घेण्याची मागणीही केली आहे. देशाची घटना आणि प्रजासत्ताक वाचवण्यासाठी मी राजीनामा दिला नसून आता दोन दिवसांत राजीनामा देईन, असे त्यांनी रविवारी सांगितले. जोपर्यंत जनता निकाल देत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही.

आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा जाहीर केला. जनतेच्या आशीर्वादाने भाजपच्या सर्व कारस्थानांचा मुकाबला करण्याची ताकद आपल्याकडे आहे, असे ते म्हणाले. आम्ही भाजपपुढे झुकणार नाही, थांबणार नाही आणि विकणार नाही.

Pune : गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही सायंकाळी 4 वाजता निघणार ‘दगडूशेठ’ गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक

आज आम्ही दिल्लीसाठी खूप काही करू शकतो कारण आम्ही प्रामाणिक आहोत. आज ते आपल्या प्रामाणिकपणाला घाबरतात कारण ते प्रामाणिक नाहीत. ‘मनी टू पॉवर आणि पॉवर टू मनी’ या खेळाचा मी भाग झालो नव्हतो. दोन दिवसांनी मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा (Delhi) देईन. मला न्यायालयाकडून न्याय मिळाला, आता जनता न्यायालय मला न्याय देईल. असे केजरीवाल यांनी जाहीर केले.

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share