Delhi Corona Update: दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन रुग्णालयात दाखल

Delhi Corona Update: Delhi Health Minister Satyendra Jain admitted to hospital काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही खोकला आणि ताप आल्यानंतर घरी क्वारंटाईन झाले होते.

एमपीसी न्यूज – देशाची राजधानी दिल्लीत कोरोना विषाणूची लागण सातत्याने वाढत आहे. दरम्यान, दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृती खालावली आहे. श्वासोच्छवासास त्रास आणि ताप आल्याने त्यांना राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी खोकला आणि ताप आल्यानंतर स्वतःला घरी क्वारंटाईन करून घेतले होते. यानंतर मुख्यमंत्र्यांची कोरोना टेस्टही झाली. सुदैवाने केजरीवाल यांच्या कोरोना टेस्टचा अहवाल निगेटीव्ह आला.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, “तुमच्या प्रकृतीची काळजी न घेता तुम्ही दिवसात चोवीस तास लोकसेवेत गुंतले. काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा.”

सत्येंद्र जैन यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, काल रात्री जास्त ताप आला आणि अचानक ऑक्सिजनच्या पातळीत घट झाल्यामुळे मला आरजीएसएसएचमध्ये दाखल करण्यात आले आहे. सर्वांना अपटेड ठेवीन.

दिल्लीत कोरोना प्रकरणे थांबत नाहीत

गेल्या 24 तासांत आज दिल्लीत 1,647 नवीन रुग्ण आढळले आहेत. आज, कोरोना विषाणूमुळे आणखी 73 जणांना आपला जीव गमवावा लागला. राजधानी दिल्लीत आता कोविड -19 ची एकूण प्रकरणे 42,829 वर पोचली आहेत. त्याचवेळी मृतांचा आकडा 1400 वर पोहोचला आहे. आरोग्य विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, गेल्या 24 तासांत 73 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.